Dighi : विद्यार्थी, पालकांसाठी संवाद पेटी

दिघीतील शाळेत अनोखा उपक्रम

एमपीसी न्यूज – विद्यार्थी, पालक, शिक्षकांसाठी सुसंवाद करण्यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी संवाद पेटीचा अनोखा उपक्रम दिघीतील क्रांतिसिंह नाना पाटील शिक्षण मंडळाच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आला आहे. या पेटीत विद्यार्थी, पालक आपल्या सूचना लिखित स्वरूपात टाकू शकतात. 

संवाद पेटी हा उपक्रम शाळा आणि सेव्ह द चिल्ड्रेन इंडिया, एडूको यांच्या संयुक्त विद्यमाने बविण्यात येत आहे. संवाद पेटीच्या उद्‌घाटनाप्रसंगी नगरसेविका हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, जवान सतिश पालांडे, सेव्ह द चिल्ड्रेन इंडियाचे सोमनाथ हुचगोळ, पतंग वर्ग शिक्षिका उषा भोसले, शहाजी पाटील, मारूती करंडे, विशाल घुले, मुख्याध्यापिका मनिषा निकम आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

विद्यार्थी, पालक, शिक्षकांसाठी सुसंवाद करण्यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या दृष्टीने या संवाद पेटी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत बोलताना सोमनाथ हुचगोळ म्हणाले की, विद्यालयाचा प्रत्येक मुलगा, मुलगी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक या संवाद पेटीमध्ये आपली मते लिखित स्वरूपात टाकू शकतात. त्यावर नाव नसले तरी चालेल. या चिठ्या दोन आठवड्यांनी मुख्याध्यापिका, शिक्षक, पगंत वर्गाचे शिक्षक यांच्या उपस्थितीत काढल्या जातील. त्याचे जाहीर वाचन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मनिषा निकम यांनी केले. सूत्रसंचालन संजना भवारी, स्नेहल बोरसे यांनी तर योगिता क्षिरसागर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.