Chakan News : चाकण परिसरातील कंपनी प्रतिनिधींशी पोलीस आयुक्तांचा संवाद

एमपीसी न्यूज – चाकण परिसरातील कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बैठक घेतली. महाळुंगे पोलीस चौकी आणि फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या बैठकीत कंपन्यांना भेडसावणाऱ्या समस्या व उपाययोजना या विषयांवर चर्चा करण्यात आली. बुधवारी (दि. 4) दुपारी खालुम्ब्रे येथे ही बैठक पार पडली.

बैठकीसाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजपुत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, एम‌आयडीसी विभागाचे मुख्य अभियंता पाटील,  वाघ, पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार बोर्ड, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बटवाल आणि कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठा औद्योगिक पट्टा आहे. चिंचवड, भोसरी, चाकण परिसरात लहान मोठ्या हजारो कंपन्या आहेत. कंपनी मधील युनियन समस्या, कामगार समस्या, वाहतूक समस्या, चारित्र्य पडताळणी, सीसीटीव्ही, वाहतुकीच्या समस्या, पार्किंग, महिला सुरक्षा व कंपन्यांमधील चोऱ्या, इत्यादी विषयांवर बैठकीत चर्चा झाली.

पोलीस आयुक्तांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. काही मुद्द्यांवर तातडीने निर्णय घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. औद्योगिक परिसरात होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्व कंपन्यांनी कंपनी समोरिल रस्त्यावर, सुरक्षा भिंतिचे जवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले. माथाडीचा विषयही या बैठकीत चर्चिला गेला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.