Nashik News : महाविकास आघाडी सरकारकडून मिळणाऱ्या ‘नैतिक’ रसदीवर कम्युनिस्टांची मुंबईकडे धाव !

शेतकरी मित्र बिंदूशेठ शर्मा

एमपीसी न्यूज : कृषीक्षेत्रात कार्यरत असलेल्या दलालांच्या पाठिंब्यावर दिल्लीच्या सीमेवर गेली ५७ दिवस दोन राज्यातील शेतकऱ्यांकडून सुरू असलेले आंदोलन राजकीय वातावरण निर्मिती करण्याच्या हेतूने होत आहे.

मात्र आंदोलनाला आणखी निर्णायक टप्प्यावर घेऊन जाण्याच्या नावाने कम्युनिस्ट प्रणित संयुक्त किसान मोर्चा देशभर दि. २३ ते २६ जानेवारी या काळात राज्यपाल भवनावर आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचे शेतकरी मित्र बिंदूशेठ शर्मा यांनी सांगितले.

महाराष्ट्रात या हाकेला कम्युनिस्टांची राज्य कौन्सिल अर्थात राज्य पॉलिट ब्युरोने अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून प्रतिसाद देत क्षीण झालेली आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकरी आंदोलनात गर्दी जमविण्यासाठी शेतकऱ्यां व्यतिरिक्त कामगार संघटना, सामाजिक व राजकीय संघटनाना गर्दी जमवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत या आंदोलनात संपूर्ण ताकदीने उतरण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेत या विधेयकांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता या कायद्यातील बहुतांश तरतुदी राज्य सरकार मध्ये अंमलात आलेल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यातच या विधेयकातील बहुतांश बाबींचा उल्लेख आहे.

त्यामुळे संपूर्ण भारतभरातून या कृषी कायद्यांना जोरदार समर्थन मिळालेली असताना राजकीय विरोध दर्शविण्यासाठी आणि आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधी पक्ष अशा पद्धतीची वातावरण निर्मिती करत असल्याचा माझा समज झाला आहे. असे बिंदूशेठ शर्मा म्हणाले.

किसान सभेच्या निवेदनानुसार दि. २३ जानेवारी रोजी राज्यातील विविध भागांमधून ट्रॅक्टर्स व इतर वाहनांमधून हजारो श्रमिक  मुंबईच्या दिशेने निघतील. २४ जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे सर्व जण एकत्र येतील व २५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता राज भवनाच्या दिशेने कूच करतील.

२६ जानेवारी रोजी शेतकरी कामगारांतर्फे आझाद मैदान येथे राष्ट्रीय ध्वजवंदन केले जाईल.  शेतकरी राज्यातील विविध भागांमधून वाहनांमधून २३ जानेवारी रोजी नाशिक येथील गोल्फ कलब मैदान येथे जमतील आणि मुंबईकडे मार्गस्थ होतील असे नमूद केले आहे.

अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र, या आंदोलनात संपूर्ण ताकदीने उतरणार असल्याची आवई उठवण्यात आली अाहे. ती संपूर्ण ताकद आपल्याला लवकरच दिसून येईल असे शर्मा यांनी सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.