Pimpri News : वुमेन्स हेल्पलाईन फाऊंडेशनतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

नावनोंदणी करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – वुमेन्स हेल्पलाईन फाऊंडेशनतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विवाह सोहळ्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसून सोहळ्यासाठी नावनोंदणी 30 जानेवारी 2021 पर्यंत करता येणार असल्याची माहिती फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा नीता परदेशी यांनी दिली.

कोरोना साथीच्या आजारामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. त्यातून सावरण्यासाठी तसेच मुलींचे संसार आनंदाने सुरु करण्यासाठी एक हातभार म्हणून वुमेन्स हेल्पलाईन फाऊंडेशनच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सर्वधर्मीय समुदायिक विवाह सोहळ्यासाठी 30 जानेवारी 2021 पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. विवाह नोंदणी मोफत आहे. तसेच विवाह देखील मोफत लावून दिला जाणार असल्याचे फाऊंडेशनकडून सांगण्यात आले आहे.

सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा नीता परदेशी, अॅड. सारिका परदेशी, दीपाली येवले, दीपा कुलकर्णी, अलका भास्कर, मंगलताई मुऱ्हे यांनी केले आहे.

गरजू नागरिकांनी वुमेन्स हेल्पलाईनशी 9119428450 / 9822001950 / 6764694144 / 9730502662 / 9730067651 / 9579265181/ 9823568337 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.