_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri : मेल हॅक करुन कंपनीला एक लाखाचा गंडा

Company cheated to the tune of Rs. 1 Lakh by hacking E-mail account.

एमपीसी न्यूज – कंपनीचा मेल आयडी हॅक करुन करून त्याद्वारे ग्राहक कंपनीशी व्यवहार करत ग्राहक कंपनीची एक लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 18 जून रोजी एमआयडीसी कुरुळी, चाकण येथे राधेशाम वेलफन प्रा. ली. या कंपनीत घडला.

अजय भीमराव होले (वय 33, रा. श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटी, दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होले यांची एमआयडीसी कुरुळी, चाकण येथे राधेशाम वेलफन प्रा. ली. ही कंपनी आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीच्या मशीनचा पार्ट लोकल मार्केट मध्ये कुठे मिळतो, याची ऑनलाईन चौकशी केली.

_MPC_DIR_MPU_II

त्यावेळी त्यांना Hew Precision Works pvt ltd या कंपनीत पार्ट मिळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, त्यानंतर कंपनीचे संचालक विशाल पंजाबी यांनी Hew Precision Works pvt ltd या कंपनीशी संपर्क केला. कोटेशन मागवून त्याद्वारे ऑनलाईन पेमेंट देखील केले.

पेमेंट झाल्यानंतर पाच दिवसांनी फिर्यादी होले भोसरी येथील संबंधित कंपनीत गेले. त्यावेळी कंपनीकडून सांगण्यात आले की, होले यांनी केलेले पेमेंट हे आमच्या बँक खात्यावर केलेले नाही.

अन्य खात्यावर केले आहे. कंपनीचा मेल आयडी हॅक केला असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.