Pimple-saudagar News : नफ्याचे आमिष दाखवत फ्रेंचाइजी च्या बहाण्याने एक कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – कंपनी ची फ्रेंचाइजी देण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या कारणांसाठी व्यावसायिकाकडून एक कोटी 7 लाख 44 हजार रुपये घेत फसवणूक केली.(Pimple-saudagar News)हा प्रकार सप्टेंबर 2021 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत पिंपळे सौदागर परिसरात घडला.

संतोष सुरेश काकडे (वय 39, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार याकूब अली खाजा अहमद, राघवेंद्र रेड्डी नानायाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना झायसोल इंटिग्रेटेड सोल्युशन या कंपनीची फ्रेंचायजी देण्याचे आमिष दाखवले.  (Pimple-saudagar News) फ्रेंचायजीसाठी सुरुवातीला आरोपींनी काही रक्कम घेतली. त्यानंतर ऑफिसचे भाडे, डीपॉझीट, इंटेरियर, कंपनीचे हब विकत घेणे, हबचे इंटेरियर आणि अन्य कारणांसाठी एक कोटी सात लाख 44 हजार 600 रुपये घेतले. स्टोअर सुरू झाल्यानंतर खूप फायदा होईल, असे आरोपींनी आमिष दाखवले.

Dehu road : देहूगाव येथे दीड लाखांचा पिकअप चोरीला

काही कालावधीनंतर संतोष काकडे यांना आपली फसवणूक होत असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी आरोपींना फोन करून पैशांची मागणी केली. (Pimple-saudagar News) त्यावेळी आरोपी याकूब याने पैसे घेण्यासाठी हैद्राबाद येथे आलास तर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. संतोष यांनी दिलेल्या रकमेचा आरोपींनी अपहार करत फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.