Chinchwad : कंपनीने वैधता संपलेले केमिकल सोडल्याने नाला झाला लालभडक!

company Releases expired Chemicals into a nallah at Kalbhornagar foul smell in kalbhornagar, chinchwadgaon महानगरपालिकेने केले सुपर इंडस्ट्रीजला 'सील'

एमपीसी न्यूज – ‘सुपर इंडस्ट्रीज’ या चिंचवड, काळभोरनगर येथील कंपनीने वैधता संपलेले कॉन्सन्ट्रेटेड सोलुशन चिंचवड स्टेशन जवळच्या नाल्यात सोडून दिले. या केमिकलमुळे वातावरणात दुर्गंधी पसरली होती. नागरिकांना डोकेदुखी व तीव्र उग्र वासाचा त्रास सहन करावा लागला.

याबाबत पिंपरी चिंचवड महापालिका पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना विचारले ते म्हणाले, या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सुपर इंडस्ट्रीज कंपनीला सील करण्यात आले आहे.

तसेच, कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. नाल्यात सोडलेले सोलुशन घातक नसल्यामुळे याचा आरोग्यावर काही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या नाल्याचे पाणी एसटीपीला जाते असे वाटल्यामुळे आम्ही नाल्यात हे सोलुशन टाकले असा निर्वाळा कंपनी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

सुपर इंडस्ट्रीजने वैधता संपलेले कॉन्सन्ट्रेटेड सोलुशनचे सहा बॅरल दुपारी बाराच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील नाल्यात सोडून दिले. त्यानंतर नाल्याचे पाणी काही काळासाठी लाल रंगाचे झाले होते. तसेच चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन, काळभोर नगर, मोहन नगर आणि आजूबाजूच्या परिसरत तीव्र प्रकारचा उग्र दर्प सुटला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.