Chinchwad : कोयत्याने घरातील सामानाची तोडफोड केल्याप्रकरणी पत्नीची पतीविरोधात तक्रार

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून पतीने लोखंडी कोयत्याने घरातील सामानाची तोडफोड केली. तसेच पत्नीला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून आला. याप्रकरणी पत्नीने पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 3) सायंकाळी सातच्या सुमारास अजंठानगर, चिंचवड येथे घडली.

दीपाली राहुल भोसले (वय 27, रा. जुना अजंठानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल सुरेश भोसले (वय 31) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी आरोपी राहुल लोखंडी कोयता घेऊन घरात आले. मुलांना त्यांच्या आईकडे का पाठवले? अशी विचारणा करत दीपाली यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच लोखंडी कोयत्याने लोखंडी कपाटाचा आरसा फोडून नुकसान केले. दीपाली यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता राहुल यांनी पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.