Pimpri News: शहरातील हॉस्पिटल विरोधात ” अपना वतन ” संघटनेची आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार

एमपीसी न्यूज: पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी व धर्मादाय रुग्णालयाच्या ,माध्यमातून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीबाबत अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ . तानाजी सावंत यांची पुणे येथे भेट घेतली. त्यावेळी वैद्यकीय नियमाचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी रुग्णालयावर कारवाई कारण्याबतचे निवेदन त्यांना देण्यात आले व चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी शहरातील रुग्णालयांची चौकशी कर्णयचे आश्वासन दिले. सादर बैठकीत अपना वतन संघटनेच्या महिला अध्यक्ष राजश्री शिरवळकर , संघटक हमीद शेख , महिला उपाध्यक्ष निर्मला डांगे , गणेश जगताप , प्रकाश पठारे , उस्मान शेख , समीर अत्तार , रमेश बोटकुले आदीजण उपस्थित होते.

अपना वतन संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड शहरातील लोकसंख्या जवळपास २० लाखाच्या आसपास आहे. शहरामध्ये संपूर्ण देशातून कामासाठी नागरिक आलेले आहेत. याच ठिकाणी स्थायिक झालेलं आहेत. झोपडपट्टी परिसर, एमआयडीसी मधील कामगार वर्ग, मध्यमवर्ग असा मोठा समुदाय शहरात आहे. शहरामध्ये वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खासगी रुग्णालये तयार झाले आहेत. तसेच काही रुग्णालयांना सरकारने सुविधा दिलेल्या आहेत. परंतु काही खाजगी व धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल व आर्थिक पिळवणूक केली जात आहे. महाराष्ट्र शुश्रुषागृह ( सुधारित ) नियम २०२१ ची अंमलबजावणी या रुग्णालयातून होताना दिसून येत नाही. त्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

Pimpri News: फुल मार्केट होणार प्रशस्त

महाराष्ट्र शुश्रुषागृह ( सुधारित ) नियम २०२१ प्रमाणे रुग्णालयाच्या दर्शनी भागात स्थानिक पर्यवेक्षीय प्राधिकाऱ्याचे आणि तक्रार निवारण कक्षाचे संपर्क क्रमांक असणे बंधनकारक आहे. रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह , अतिदक्षता विभाग ,प्रसूतिगृह यांमध्ये शासनाने विहित केलेल्या प्रमाणकांच्या निकषांचे पालन होताना दिसत नाही. अनेक रुग्णालयांमध्ये पार्किंगच्या अपुऱ्या सुविधा , अपुरा रक्तसाठा , आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची कमतरता आढळून येते.

महाराष्ट्र शुश्रुषागृह ( सुधारित ) नियम २०२१ मधील नियम ११ व अनुसूची ३ अनुसार सर्व खासगी रुग्णालये व नर्सिंग होम यांनी १५ सुविधांचा दर दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये प्रवेश शुल्क, प्रतिदिन आंतररुग्ण दर ( खाट /अतिदक्षता कक्ष ) , वैद्यकीय शुल्क ( प्रति भेट ) , सहायक वैद्यकीय शुल्क (प्रति भेट ) , भूल शुल्क , शस्त्रक्रिया सहाय्यक शुल्क , भूल सहाय्यक शुल्क, रुग्णालय शुल्क (प्रतिदिन), सलाईन व रक्त संक्रमण शुल्क ,विशेष भेट शुल्क , मल्टिप्यारा शुल्क , पॅथॉलॉजी शुल्क , ऑक्सिजन शुल्क , रेडिओलॉजी व सोनोग्राफी शुल्क यांचा समावेश होतो. परंतु अनेक रुग्णालयामध्ये हे दरपत्रक लावलेले नाहीत. तसेच अनेकवेळा रुग्ण दगावल्यानंतर रुग्णालयाकडून मृतदेह ताब्यात देण्यात येत नाही . रुग्णांचा परिवार दुःखात असताना त्यांचा मानसिक छळ केला जातो .

अशा अनेक प्रकारे शहरातील रुग्णालयांकडून महाराष्ट्र शुश्रुषागृह ( सुधारित ) नियम २०२१ चे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. तसेच रुग्णांना उपचार घेत असताना देण्यात आलेली औषधे रुग्णालयाच्या अखत्यारीत असलेल्या मेडिकल मधून घेण्यास भाग पडले जाते . या मेडिकल मध्ये ठराविक कंपन्यांची व महागडी औषधे उपलब्ध असतात . हे दर सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर असतात . अशाप्रकारे येनकेन प्रकारे नागरिकांची आर्थिक लूट चालू आहे. त्यामुळे शहरातील सर्व खाजगी व धर्मादाय रुग्णालयाचे ऑडिट करून दोषी रुग्णालयावर कडक कारवाई करावी व शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये महाराष्ट्र शुश्रुषागृह ( सुधारित ) नियम २०२१ प्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.