Pimpri News : महापालिका आयुक्तांविरोधात राज्य माहिती आयोगाकडे तक्रार

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील हे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंमलात आणण्याकरिता हताश दिसत आहेत. त्यांना माहिती अधिकार अधिनियमाचे ज्ञान नसल्याचे दिसून येत आहे. माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त, जनमाहिती अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.

याबाबत नाईक यांनी राज्य माहिती आयोगाला लेखी तक्रार अर्ज दिला आहे. त्यात म्हटले आहे की, 30 मार्च 2022 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005, 6(1) नुसार माहिती मिळण्याकरिता विनंती अर्ज केला होता. 10 रुपयांचे तिकिटाचे शुल्क भरुन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या नावाने अर्ज केला होता. त्यात महापालिकेतील शासकीय वाहनांची संख्या, इंधनावरील होणारा खर्च, चालकांचे वेतन याविषयी माहिती मागविली होती.

महापालिकेने तो अर्ज माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 6 (3) नुसार मध्यवर्ती भांडार विभागाकडे वर्ग करायचा होता. पण, तसे न करता भांडार विभागाला 5 एप्रिल 2022 रोजी अर्ज प्राप्त झाला असल्याचे त्या अर्जात नमूद केले आहे. याबाबत भांडार विभागातील जनमाहिती अधिकारी मुबारक पानसरे यांना विचारले असता त्यांनी काही एक उत्तर दिले नाही.

Chinchwad News : आशयगर्भता हा अति लघू कथेचा गाभा – राजन लाखे

महापालिका आयुक्त  माहिती अधिकार अधिनियम 2005 अंमलात आणण्याकरिता हताश दिसत आहेत. त्यांना माहिती अधिकार अधिनियमाचे ज्ञान नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 18 (1) नुसार आयुक्तांविरोधात आयोगाकडे तक्रार केली. आयुक्त आणि जन माहिती अधिकारी यांच्याविरोधात माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 20 (2) नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी नाईक यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.