BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: अस्वच्छतेच्या तक्रारींसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधा

177
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत शहर स्वच्छतेची कामे केली जातात. आरोग्यविषयक काही तक्रार असल्यास सारथी हेल्पलाईनच्या 8888006666 या क्रमांकवर किंवा आरोग्य विभागाच्या 7745065999 व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आरोग्याधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘इ’, ‘फ’, ‘ग’ आणि  ‘ह’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत आरोग्य विभागामार्फत शहरातील दैंनदिंन स्वच्छताविषयक कामे केली जातात. त्यानुसार रस्ते साफसफाई, उघड्या गटर्सची साफसफाई, घरोघरचा कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक करणे, परिसरातील कचरा ढिग उचलणे/ कचरा कुंड्याची स्वच्छता, खुल्याजागेत कचरा जाळणेस प्रतिबंध करणे,मृत प्राण्यांची विल्हेवाट लावणे (कुत्रे,मांजर, डुक्कर,उंदीर, घुशी, पक्षी इ.), सामुदायिक व सार्वजनिक शौचालय मुतारी यांची साफसफाई करणे, सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे/ उघड्यावर मल विसर्जन करणेस प्रतिबंध करणे, खाजगी सेफ्टीक टँक उपसणे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वैयक्तीक शौचालयास अनुदान देणे, डासप्रतिबंधक उपाययोजना करणे, प्लास्टीक बंदी कारवाई इ. अनुषंगीक कामे शहर स्वच्छ ठेवणेसाठी केली जातात.

नागरिकांनी वॉर्डमधील आरोग्य विषयक कामकाजा संदर्भातील माहिती तसेच तक्रारी बाबत महापालिकेच्या सारथी हेल्पलाईन क्रमांक 8888006666 किंवा आरोग्य विभागाच्या व्हॉट्स अॅप नं 7745065999 वर संपर्क साधावा. तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील खालील सहाय्यक आरोग्याधिकारी  यांच्याशी संपर्क साधावा.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातील  सहाय्यक आरोग्याधिकारी एम. एम.  शिंदे यांच्याशी 9922501914 मोबाईलवर संपर्क साधू शकता. तसेच [email protected][email protected]मेल करु शकता.  ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय सहाय्यक आरोग्याधिकारी  के.डी. दरवडे 9922501898 [email protected][email protected], ‘क’क्षेत्रीय कार्यालयातील  सहाय्यक आरोग्याधिकारी बी.बी. कांबळे 9922501869,  [email protected][email protected], ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातील  सहाय्यक आरोग्याधिकारी व्ही.के. बेंडाळे 9922501877,  [email protected][email protected], ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयातील  सहाय्यक आरोग्याधिकारी पी.आर. तावरे 9922501885 [email protected][email protected], ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातील  सहाय्यक आरोग्याधिकारी डी.जे. शिर्के ,  9922501876 [email protected][email protected], ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील  सहाय्यक आरोग्याधिकारी एस.एस. कुलकर्णी, 9922501875, [email protected][email protected], ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील  सहाय्यक आरोग्याधिकारी डी.एस. सासवडकर  9922501896,  [email protected][email protected] यांच्याशी संपर्क साधावा.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.