Khadki : पुणे शहर बंदला पाठिंबा देण्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट क्षेत्र पूर्ण बंद

एमपीसी न्यूज : पुणे शहर बंदला पाठिंबा देण्यासाठी (Khadki Cantonment area) खडकी कॅन्टोन्मेंट क्षेत्रात पुर्ण बंद पाळण्यात येत आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विश्रांतवाडी, बोपोडी व दापोडी सारख्या आसपासच्या परिसरासाठी खडकी ही मुख्य बाजारपेठ आहे. खडकी हे वेगळे शहर असले तरी पुण्याच्या जवळ असल्याने पुण्यशी जास्त संबंध येतो.

रवी सोनवणे (विभाग समन्व्यक, शिवाजीनगर मतदारसंघ, शिव सेना) म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हकालपट्टीसाठी आज पुणे बंदच्या हाकेला खडकीमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण बाजारपेठ, भाजीमंडई व दुकाने व्यापाऱ्यांनी उस्फूर्त पणे बंद ठेवून पाठिंबा दिला आहे.”

Pune : महापुरुषांच्या अवमान प्रकरणी पुण्यात बंद पाळत निषेध मोर्चा

या बंदमध्ये सर्व शिवप्रेमी संघटना,  मराठा मंडळ खडकी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी व इतर राजकीय संघटनांनी सहभाग घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.