Dehuroad News : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीत मेडिकल व दूध विक्री वगळता संपूर्ण लॉकडाऊन

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीत मेडिकल व दूध विक्री वगळता संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे आदेश कॅंटोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल यांनी काढले आहेत.

या आदेशानुसार देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीत शुक्रवार (दि.9 एप्रिल) सायंकाळी सहा  ते सोमवारी (दि.12 एप्रिल) सकाळी सातपर्यंत संपूर्ण लॉकडाउन असेल. 

कोरोना विषाणूचा (COVID-19) वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डने हा निर्णय घेतला आहे. या कालावधीत फक्त मेडिकल व दूध विक्री सुरू राहील. राज्यातील विकेंड लॉकडाऊनच्या धर्तीवर देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील हा आदेश 30 एप्रिलपर्यंत लागू राहील, असे हरितवाल यांनी  आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.