Nigdi News: रुपीनगरमधील अर्धवट कामे पूर्ण करा, मनसेचे ‘फ’ प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन

एमपीसी न्यूज : प्रभाग क्रमांक 12  रूपीनगर, तळवडे परिसरातील अर्धवट राहिलेली सर्व कामे पूर्ण करावीत या मागणीसाठी मनसेने ‘फ’ प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन केले. कामांची सुरुवात करण्यासाठी सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

शहराध्यक्ष, नगरसेवक सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शहर सचिव रूपेश पटेकर, राहुल जाधव, उपशहराध्यक्ष विशाल मानकरी, चंद्रकांत दानवले, राजू सावळे, विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे,  दत्ता देवतरासे, सुशांत साळवी,  राजू भालेराव, अश्विनी बांगर, सीमा बेलापुरकर, अनिता पांचाळ, संगीता देशमुख, स्नेहल बांगर,  विष्णु चावरीया, सचिन मिरपगार,  सुरेश सकट, सुरज जाधव, रवि जाधव, पंकज दळवी, गणेश उज्जनकर, प्रविण माळी, देवेंद्र निकम, कुलदीप रानडे, बालाजी पांचाळ, नारायण पठारे, दत्ता धर्मे, सागर सोनटक्के, प्रतिक शिंदे, नागेश पाटील उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने प्रभागात कामे चालू आहेत. परंतु, कामे करत असताना रस्त्यांवरील खड्डे मात्र बुजवले जात नाहीत. तसेच अर्धवट कामे पूर्ण करुण नवीन कामांना सुरवात करणे आवश्यक होते. परंतु, जाणुन बुजुन त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.