Nigdi News : सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम तातडीने पूर्ण करा – समीर जावळकर

एमपीसी न्यूज – निगडी, प्राधिकरणातील सेक्टर नंबर 25 सिंधूनगर येथील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी भाजपचे उपाध्यक्ष समीर जावळकर यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात जावळकर यांनी म्हटले आहे की, गेल्या आठ महिन्यांपूर्वी महापालिकेच्या वतीने  ठेकेदारास सिमेंट काँक्रीट रोड बनवण्यासाठी काम दिले. ठेकेदाराच्या नियोजन शून्य तसेच वेळ काढूपणामुळे कामास विलंब होत आहे. महापालिकेचे देखील आर्थिक नुकसान होत आहे.

ठेकेदाराच्या चुकीमुळे येथील राहणाऱ्या नागरिकांच्या आठ-दहा घरांमध्ये पावसाचे पाणी गेले होते. त्यांचे फर्निचर, टीव्ही, फ्रिज तसेच अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यास सर्वस्वी ठेकेदार जबाबदार आहे. या कामाचा दर्जा तपासावा.  ठेकेदारास लवकरात लवकर काम करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी जावळकर यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.