Vaccination News : देशातील 75 टक्के प्रौढ लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण

एमपीसी न्यूज – कोरोना लसीकरणात मोहीमेअंतर्गत देशातील 75 टक्के प्रौढ लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बाबत आनंद व्यक्त केला आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. सबका साथ सबका विकास अंतर्गत देशातील 75 टक्के प्रौढ लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण केले आहे. असे ट्विट मनसुख मांडविया यांनी केले आहे.

मनसुख मांडविया यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले, ‘देशातील एकूण प्रौढ लोकसंख्येपैकी 75 टक्के प्रौढ व्यक्तींचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल आपल्या देशवासीयांचे अभिनंदन. आपली लसीकरण मोहीम यशस्वी करणाऱ्या सर्वांचा अभिमान आहे.’

दरम्यान, कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम अंतर्गत 165.70 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.