Hinjawadi : संगणक अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – संगणक अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी दहाच्या सुमारास चिंचवडमधील बिजलीनगर येथे घडली.

अभिजित रामदास मुळे (वय 38, रा. बिजलीनगर, चिंचवड. मूळ रा. कळंब, जि. उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळे हे हिंजवडीमधील एका नामांकित आय टी कंपनीत संगणक अभियंता म्हणून कामाला आहेत. आज सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी बिजलीनगर येथील राहत्या घरी छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.