Wakad Crime: कॉंगो देशातील महिलेस दिल्लीतून अटक, वाकड पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज : वाकड पोलिसांनी एका कॉंगो देशातील महिला नागरिकास अटक केली आहे. पोलिसांनी दिल्लीत जाऊन या महिलेस अटक केले आहे.(wakad Crime) अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2,आनंद भोईटे, यांनी दिली आहे. या महिलेने वाकड परिसरातील एका घटस्फोटीत महिलेला मॅट्रिमोनिअल साईट वर विविध अमीषे दाखवून तिची 12.29 लाख रुपयांची फसवणूक केली होती.

वाकड पोलिसांनी दिल्लीत जाऊन कॉंगो देशाची एका महिला नागरिकास अटक केली आहे. याबाबत पीडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात भा द वि कलम 419, 420 व माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 सी, 66 डी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

वाकड परिसरातील एका घटस्फोटीत महिलेची मॅट्रिमोनीयल डेटिंग ॲप वरून माहिती घेऊन आरोपीने डॉ अर्जुन नावाने संपर्क केला व फिर्यादी महिलेस तो यूएसए मध्ये कॉस्मेटिक सर्जन असल्याचे सांगून फिर्यादी बरोबर चांगली ओळख वाढवून फिर्यादीची लग्न करण्याचे व भारतात येऊन स्थायिक होण्याचे अमिष दाखविले.(Wakad Crime) त्याच्या आईस हेड इंजुरी झाली असल्याने तिच्यावर उपचारासाठी बेंगलोर येथील औषधी बियांचे औषधे पाठविण्यासाठी तसेच सदर औषधी बियांचे व्यवसायाकरिता तसेच सदर बनावट बिया विकत घेण्यास भाग पाडून त्या विकत घेण्यासाठी युएएस मधील कंपनीचे परचेस मॅनेजरसह भारतात येत असल्याचे सांगितले.तसेच भारतात एअरपोर्टवर आल्यानंतर पासपोर्टवर ग्रीन कार्ड नसल्याने पकडल्याचे सांगून व तेथून सोडवून घेण्यासाठी.तसेच आजारी असल्याचे व तेथून सोडविण्यासाठी असे वेगवेगळ्या कारणासाठी एकूण  12.28 लाख रुपये भरण्यास भाग पाडून फसवणूक केली आहे.

Chakrashwar Temple : शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त चक्रेश्वर मंदिरात आकर्षक फुल सजावट

आरोपी फिर्यादी बरोबर ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2022 पर्यंत संपर्कात होती.(Wakad Crime)पोलिसांना तपासानंतर कळाले की, आरोपी हा बेंगलोर मध्ये आहे. या गुन्ह्याचे तपास अधिकारी संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे- 1, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एम पाटील व अमलदार हे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जानेवारी 2022 मध्ये बेंगलोर येथे जाऊन तपास केला व आरोपी निष्पन्न केला होता.

 

तेथील अधिक तपासात कळले की, महिला आरोपी ही तेथून महिन्यापूर्वीच प्रदेशात निघून गेली आहे पण तिच्याबरोबर राहणारा तिचाच अधिकार तेथेच राहत असल्याची माहिती मिळाली. साथीदाराला पकडण्यासाठी तिथे ट्रॅप लावला असताना तो त्या फ्लॅटमधून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. त्याच्याकडे एक बॅग मिळाली ज्यामध्ये एक लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, दोन मोबाईल इत्यादी प्राप्त झाला होता.(Wakad Crime) त्या महिला आरोपीच्या पासपोर्ट नंबर तिच्याविरोधात लूक आउट नोटीस(एलओसी) जारी करण्यात आली होती. त्यामुळे  दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर इम्मिग्रेशन विभागाने त्या महिला  आरोपीस ती परदेशातून परवा ती आल्यावर लगेच तबतात घेतले. तिला ऑगस्ट 19 ला अटक करून तेथील कोर्टात हजर करून तीन दिवसांची ट्रांजिट रिमांड घेण्यात आली. त्यानंतर शिवाजीनगर, पुणे येथील कोर्टात हजर करून पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. या गुन्ह्याचा सखोल तपास चालू आहे.

 

संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे यांनी पोलीस आयुक्तालयामार्फत नागरिकांना, महिलांना आवाहन केले आहे की, आरोपी हे घटस्फोटीत अगर जास्त गरजवंत महिलांची निवड करून त्यांच्याशी डेटिंग ॲप द्वारे ओळख वाढवून मोठी  अमिषे दाखवून महिलांचा विश्वास संपादन करतात.(Wakad Crime) तसेच त्यांना भावनिक साध घालून त्यांची आर्थिक फसवणूक करतात. त्यामुळे महिलांनी मॅट्रिमोनियल साइटवर/ डेटिंग ॲप वर नोंदणी केल्यावर त्या मार्फत येणारे कोणत्याही कॉलची, मेलची,  माहितीची संपूर्णपणे खात्री केल्यानंतरच  पुढील कार्यवाही करावी. काही संशय वाटल्यास नजीकच्या पोलिसांशी संपर्क करावा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.