Thomas Cup : थॉमस कप स्पर्धेतील ऐतिहासिक विजयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संघाचे अभिनंदन

एमपीसी न्यूज : ‘तब्बल 73 वर्षांनंतर थॉमस कप (Thomas Cup) स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने आज, 14 वेळा अजिंक्यपद जिंकलेल्या इंडोनेशिया संघाला 3-0 असं नमवून मिळवलेला विजय ऐतिहासिक आहे.

थॉमस कपमधील विजयाने देशवासियांना अवर्णनीय आनंद; भारतीय बॅडमिंटन संघाच्या सुवर्णयुगाची सुरुवात झाली आहे.. 

Pune News : उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा विसर पडल्याचे दिसले – चंद्रकांत पाटील

या विजयानं भारतीय बॅडमिंटन क्षेत्राची, भारतीय क्रीडा जगताची मान उंचावली आहे. पुरुष एकेरीतील विजेते लक्ष्य सेन आणि किदम्बी श्रीकांत, तसंच दुहेरी सामन्यातील विजेते सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या खेळाडूंचे खुप खुप अभिनंदन. तुमच्या कामगिरीनं देशवासियांना अवर्णनीय आनंद दिला आहे. तुमच्या यशाचा देशाला अभिमान आहे. तुमचं यश हे भारतीय बॅडमिंटनच्या सुवर्णयुगाची सुरुवात आहे.’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी थॉमस कप (Thomas Cup) विजेत्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचं अभिनंदन केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.