Pune News : ‘माध्यमांसमोर पक्षाचे जाहीर धिंडवडे काढणाऱ्यांवर’ काँग्रेस पक्षाध्यक्षांनी प्रथम कारवाई करावी – गोपाळ तिवारी

एमपीसी न्यूज : राज्यातील काही असंतुष्ट नेते, व्यक्तिगत राजकीय – अस्तित्वासाठी सत्यजित तांबे व हंडोरे प्रकरणीचे निमित्ताने व्यक्तिगत हेवे-दावे काढण्या (Pune News) करीता पुढे सरसावली असून, ‘माध्यमांसमोर पक्षाचे जाहीर धिंडवडे काढुन, पक्षाचीच बदनामी करत आहेत’ त्यामुळे त्यांच्यावर प्रथम पक्षश्रेष्ठींनी त्वरित कडक कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. 

माध्यमांसमोर न जाता ही त्यांना आपली बाजू पक्षाध्यक्षां समोर मांडता आली असती, मात्र एकीकडे सर्व विचारांती पक्षाध्यक्ष  खरगेजी यांनी ‘सत्यजित तांबे प्रकरणी शिस्तभंग समितीचा निर्णय’ जाहीर केला असतां, पुन्हा पक्षाध्यक्षांच्या निर्णयावरच् एक प्रकारे आक्षेप घेणे हा कोणता प्रकार आहे..(?) पक्ष-विरोधी भुमिकेतुन, पक्षाचे जाहीर धिंडवडे काढणे हेच पक्ष विरोघी कृत्य असुन, याची गंभीर दखल घेऊन माध्यमां समोर आरोप करणाऱ्यांवरच(माजी आमदार देशमुख) पक्षाध्यक्षांनी प्रथम कारवाई करणेच गरजेचे आहे.

Nigdi : रस्त्यावर भिक मागणाऱ्या सोनियाची शिक्षणाच्या गोडीमुळे दुष्टचक्रातून मुक्तता

आरोप करणारे नेते, राज्यात तब्बल 16 दिवस मा राहुल गांधीजींची भारत जोडो यात्र चाललेली असतांना फारसे कुठेच दिसले नाहीत. चंद्रकांत हंडोरे पराभव प्रकरणी त्याच् वेळी केंद्रीय निरीक्षक येऊन चौकशी करून तत्कालीन अध्यक्षा मा सोनियाजीं कडे अहवाल सोपवला आहे.. या प्रकरणी माजी आमदार देशमुख वेगळे काय सांगत आहेत.. महाराष्ट्रासह इतर ही प्रदेश अध्यक्षांच्या नियुक्त्यांची (प्रोसीजर) प्रक्रीया चालू आहे.. असे असतांना माध्यमांसमोक पक्ष 5 व्या क्रमांकावर जाईल अशी पक्षास खच्ची करणारी निंदनीय वक्तव्ये करण्यात कोणती धन्यता मानीत आहेत.,(?) असा सवाल ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा यांनी केला…!

राज्यात प्रदेशाध्यक्ष व विधीमंडळ पक्षनेते व माजी मुख्यमंत्र्या सह, सर्व नेते मा राहुजींच्या पदयात्रेसाठी व जाहीर सभांसाठी मार्गावरील जिल्ह्यांमध्ये जाऊन झटत होते. पक्षाध्यक्ष व इतर ही नेते सतत राहुलजीं सोबत चालत होते, पदाधिकारी व सामान्य कार्यकर्त्यांच्या भेटी घालत होते. (Pune News) व  त्यामुळे ‘राज्यात काँग्रेस पक्षास पोषक झालेले वातावरण’ काही नेते स्वअस्तित्वासाठी, अहंभाव व संकुचित हेतुने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते राज्यातील काँग्रेसजन खपवुन घेणार नाहीत असा संतप्त ईशारा देखील गोपाळदादा तिवारी यांनी दिला..व पक्षश्रेष्टींनी पक्षाची लक्तरे माध्यमांसमोर टांगणाऱ्यांवर त्वरीत शिस्त भंगाची कडक कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.