Pimpri News : शहरातील खासगी शाळांच्या कारभाराविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील काही खासगी शाळांचा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने गैरकारभार सुरू आहे. शासकीय नियंमांची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप करत या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते शासकीय स्तरावर तक्रार करून पाठपुरावा करत आहे. शाळांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

याबाबत युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, नॅशनल स्टूडंस युनियन ॲाफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे यांनी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाकडे याबाबत पुराव्यासहीत लेखी तक्रारी केल्या आहेत.

याबाबत शिक्षण मंडळाने प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या पत्रव्यवहारास व मागविलेल्या माहीतीस न जुमानता शाळांकडून टोलवाटोलवी केली जात आहे. याबाबत काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या आंदेलनाच्या तयारीत असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

नियमबाह्य पध्दतीची प्रवेश प्रक्रिया राबविणे, प्रवेशासाठी अतिरिक्त पैसे घेणे, शासन नियमांना डावलून वारंवार फी साठी त्रास देणे, न दिल्यास ॲानलाईन शिक्षण बंद करणे, शिक्षण हक्क कायद्यातील शालेय नियमावलीचे पालन न करणे, नियमबाह्य कारभार करणे, मुख्याध्यापक नेमणूक निकषांचे उल्लंघन, अल्प संख्याक दर्जा प्राप्त असताना निसमावली न पाळणे, पालकांशी गैर वर्तन करणे तसेच प्रशासकीय बाबींचे पालन न करणे, वेळेत माहीती न पुरवणे या तक्रारीचा समावेश आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वारंवार शिक्षण मंडळाकडे पाठपुरावा करूनही उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. एकाच कारणासाठी वारंवार वेगवेगळ्या नोटीसा काढून वेळ काढू पणा केला जात आहे. प्रत्यक्ष कारवाई केली जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.