Pune : प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या गैरवर्तणुकीच्या निषेधार्थ काँगेसचे मंगळवारी आंदोलन

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याशी उत्तर प्रदेश पोलिसांनी गैरवर्तणूक केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

हे आंदोलन मंगळवारी (दि. 31 डिसेंबर) सकाळी ११.४५ वा. पुण्यातील खंडोजीबाबा चौक येथे करण्यात येणार आहे. तरी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.