BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : गांधी परिवाराची ‘एसपीजी’ सुरक्षा काढल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज – केंद्रातील मोदी सरकारने राजकीय हेतूने प्रेरित होऊन गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढल्याचा आरोप करत शहर युवक काँग्रेसने त्याचा निषेध केला. तसेच गांधी परिवाराला पुन्हा सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी करण्यात आली.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आज (शनिवारी) केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, सामाजिक चळवळीतील कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र  बनसोडे, एनएसयूआयचे शहराध्यक्ष वसीम ईनामदार, अशोक काळभोर, उमेश बनसोडे, हिराचंद जाधव, सौरभ शिंदे, नासीर चौधरी, निखिल भोईर, युवुस बागवान, अक्षय उपरे, गौरव हर्णे, गौरव चौधरी, दीपक भंडारी, अनिल सोनकांबळे,  प्रवीण जाधव, अतुल अडसुळे, फारूख खान, सुभाष वाघमारे, लक्ष्मण म्हेत्रे, विशाल कोळी, सैज्जाद शेख, रहीम चौधरी आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

ॲड. असीम सरोदे म्हणाले, ”गांधी परिवार हा कोणत्याही एका पक्षाशी संबधित आहे, असे बघणे अपूर्णपणाचे ठरेल. गांधी परिवारासोबत भारताच्या राजकारणाचा इतिहास जोडला गेलेला आहे. त्यांच्या परिवारातील लोकांवर झालेले जीवघेणे हल्ले व त्यात मृत झालेल्यांची संख्या बघता सरकारने सोनिया गांधी, राहूल गांधी व प्रियांका गांधी यांचे एसपीजी संरक्षण काढून चुकीचे कृत्य केले आहे. ईतर अनेक महत्वाचे विषय असताना सुरक्षा काढून घेणे हे मोदींना प्राधान्यक्रमाचे काम वाटले. यातच राजकीय प्रेरीत दूषित दृष्टीकोण स्पष्ट होतो”.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3