Pune : वर्धापन दिनानिमित्त काँगेस भवनला झळाळी; सोनिया, राहुल, प्रियंका यांचे मोठमोठे कटाऊट्स

एमपीसी न्यूज – काँग्रेसच्या 134 व्या वर्धापन दिनानिमित्त काँगेस भवनला झळाळी प्राप्त झाली आहे. सोनिया, राहुल, प्रियांका यांचे मोठमोठे कटाऊट्स उभारून लायटिंग, रंगरंगोटी करण्याचे काम जोरात सुरू आहे. शनिवारी (दि. 28) सायंकाळी 6 ते 9 स्नेह मेळावा आयोजित केला आहे. त्याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे निमंत्रण सर्वच राजकीय पक्षांना पाठविण्यात आले आहे. झारखंड विजयानंतर आणि महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. विधानसभा निवडणुकीत काँगेसच्या उमेदवारांचा फार थोड्या मतांनी पराभव झाला. येत्या दोन वर्षांतच पुणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. सिंगल वॉर्ड पद्धतीने निवडणूक होणार असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे येत्या काळात काँगेसला ‘अच्छे दिन’ येणार असल्याची चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.