Pimpri News: नांदेड निवडणुकीतील विजयाचा शहर काँग्रेसकडून जल्लोष

एमपीसी न्यूज – नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली मतरदासंघातील पोटनिवडणूकीमध्ये काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेश रावसाहेब अंतापुरकर सुमारे 41 हजार मतांनी विजयी झाले. यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पिंपरी चौकात फटाके वाजवून, पेढे वाटून व घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. तसेच राजस्थान, कर्नाटक,हिमाचल इतर सर्वच व महाराष्ट्रातील पोटनिवडणूकीतील विजया बाबत शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

या वेळी सोनिया गांधी झिंदाबाद ! राहूल गांधी झिंदाबाद ! प्रियांका गांधी झिंदाबाद! महाविकास आघाडी झिंदाबाद ! नाना पटोले झिंदाबाद ! अशोक चव्हाण झिंदाबाद !  अशा घोषणा देत जल्लोष केला. या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती शाम आगरवाल, माजी नगरसेवक सदगुरू कदम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, अजिंक्य बारणे, माऊली मलशेट्टी, के. एम. रॅाय, के. हरीनारायणन, इस्माईल संगम, आबा खराडे, किरण नढे, उमेश बनसोडे, वामन ऐनिले, सचिन कदम, दत्ता पवार, मिलिंद बनसोडे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले, “हा विजय सोनिया गांधी, राहूल गांधी, शरद पवार साहेब व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नानाभाऊ पटोले व अशोक चव्हाण साहेबांचा तसेच नांदेड मधील सामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे.  विविध राज्यातील जनतेने पोट निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाच्या अन्यायकारक धोरणे, जीवनावश्यक वस्तूंची महागाई, पेट्रोल डिझेलची भरमसाठ दरवाढ, शेतकरी कामगार विरोधी कायदे यांच्या विरोधात जनतेने दिलेले उत्तर आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.