Lonavala : प्रियांका गांधी यांच्या स्थानबद्धतेचा काँग्रेसकडून निषेध

एमपीसी न्यूज – काँग्रेस उत्तरप्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांना सोनभद्रा याठिकाणी जाण्यापासून रोखत उत्तरप्रदेश पोलिसांनी स्थानबद्ध केल्य‍ाचा लोणावळा काँग्रेसने निषेध नोंदविला.


उत्तरप्रदेशातील सोनभद्रा या ठिकाणी जमिनीच्या वादातून दहा जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सदर पिडितांना भेटण्याकरिता प्रियंका गांधी जात असताना त्यांना मिर्झापूर व वाराणसीच्या सीमेवर रोखण्यात आले. त्या त्याच ठिकाणी आंदोलनाला बसल्या असता त्यांना स्थानबद्ध करुन घेऊन जाण्यात आले. याप्रकाराचा काँग्रेस अध्यक्ष विलास बडेकर, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निखिल कविश्वर, पुष्पा भोकसे, दत्ता दळवी, नगरसेविका संध्या खंडेलवाल यांच्यासह माजी उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल, निलम कडू, फिरोज बागवान, जंगबहादूर बक्षी, सुनिल मोगरे आदींनी शिवाजी चौकात एकत्र येत निषेध नोंदविला तसेच शहर पोलिसांकडे निषेधाचे निवेदन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.