Lonavala : काँग्रेस नगरसेवकांनी मानधन दिले सैनिक निधीला

एमपीसी न्यूज- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना मदत म्हणून मागील दोन वर्षाचे आपले मानधन सैनिक निधीमध्ये जमा करावे असे निवेदन लोणावळा नगरपरिषदेमधील काँग्रेस आय पक्षाच्या सात नगरसेवकांनी मुख्याधिकारी सचिन पवार यांच्याकडे आज दिले.

काँग्रेसच्या गटनेत्या आरोही तळेगावकर, आरोग्य सभापती व नगरसेविका संध्या खंडेलवाल, महिला बालकल्याण समिती सभापती सुर्वणा अकोलकर, पूजा गायकवाड, बांधकाम सभापती संजय घोणे, नगरसेवक सुधीर शिर्के, नगरसेवक व पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निखिल कविश्वर यांनी आपले मागील दोन वर्षाचे मानधन सैनिक निधीसाठी दिले आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.