Delhi News: काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते अहमद पटेल यांचे निधन 

 एमपीसी न्यूज : काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. महिन्याभरापूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी सकाळी 3 वाजून 30 मिनिटांनी अहमद पटेल यांनी गुरुग्राम येथील रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.

 

_MPC_DIR_MPU_II

त्यांचा मुलगा फैजल यांनी वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. अहमद पटेल 71 वर्षांचे होते. काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेत्याच्या निधनावर पक्षाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी , यांनी ट्विटच्या माध्यमातून शोक व्यक्तकेलाय. अहमद पटेल हे पक्षाचा मजबूत स्तंभ होते. सर्वात कठिण काळात ते पक्षासोबत उभे राहिले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात आम्ही सहभागी आहोत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.