Pune : कट्टर आरएसएसचे लोकसुद्धा माझ्याकडे पाहून काँग्रेसला मतदान करतात – आबा बागूल 

एमपीसी न्यूज – जे कट्टर आरएसएसचे लोक आहेत ते सुद्धा माझ्याकडे पाहून काँग्रेसला मतदान करतात. पण ते खासदारकीला काँग्रेसला मतदान करत नाही आणि मला तिकीट दिले तर विचार देखील करतील. मात्र, मी खासदारकीचा उमेदवार नाही आणि मी तिकीट देखील मागणार नाही, असे वक्तव्य पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागूल यांनी केले आहे. पुण्यात ग्रे वॉटर प्रकल्पाचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आबा बागूल बोलत होते. 


देशातील पहिलाच ग्रे वॉटर प्रकल्प पुण्यातील सहकारनगर येथे उभारण्यात आला आहे. त्याच्या उद्घाटनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, शहराध्यक्ष रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे, आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष आल्यावर मन मोकळं बोलायला पाहिजे असे म्हणत आबा बागूल यांनी वेळ मारून नेली . तर देशात अच्छे दिन फक्त काँग्रेसच आणू शकते, असा उल्लेखसुद्धा आबा बागूल यांनी यावेळी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.