Congress : पालिका निवडणुकीत प्रत्येक प्रभागात काँग्रेसला एक जागा सोडावी, अन्यथा पोटनिवडणूक लढविण्यास सज्ज – कैलास कदम  

एमपीसी न्यूज – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत काँग्रेसला तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत प्रत्येक प्रभागात ( Congress ) एक जागा सोडावी. त्याबाबत आत्ताच बोलणी करुन घ्यावी. अन्यथा काँग्रेस चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी पक्षनेतृत्वाला सांगितले.

 

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार ठरविण्याची चर्चा करण्याबाबत प्रदेश काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची मुंबईत नुकतीच बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आमदार संग्राम थोपटे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम, पुण्याचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे उपस्थित होते.

Pune news : 6 महिन्याच्या बाळाची ढाल करत दागिने पळवले

या बैठकीत भूमिका मांडताना शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आघाडी होते. याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरुन होतो. पण, तीन विधानसभा मतदारसंघापैकी(Congress) एक मतदारसंघ काँग्रेसला सोडावा. रणनितीमध्ये जो निर्णय होईल आणि त्यात मतदारसंघ काँग्रेसला सुटला नाही. तर, महाविकास आघाडीत कोणत्याही पक्षाला मतदारसंघ सुटला. तर, प्रत्येक फलकावर काँग्रेसचे पंजा हे चिन्ह असावे. काँग्रेसला सन्मानपूर्वक वागणूक द्यावी. वरिष्ठ पातळीवरील निर्णय मान्य राहील.

 

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक महापालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट आहे. स्थानिक पातळीवर महापालिका निवडणूक अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे येणा-या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत कसे धोरण असणार आहे. महापालिकेच्या निवडणुका पुढील काही दिवसात होतील. त्यामुळे आताच पालिका निवडणुकीचा विचार करावा. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार पिंपरी-चिंचवड, भोसरी मतदारसंघात 46 प्रभाग होत (Congress) आहेत. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीतील प्रत्येक प्रभागात एक उमेदवार तरी काँग्रेसचा असावा. तरच आघाडी करावी. अन्यथा चिंचवडची पोटनिवणूक लढविण्यास आम्ही तयार आहोत. त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.