Pune : उत्तर प्रदेशमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ पुण्यात कॉँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेशमधील (Pune) विद्यार्थ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या व महाराष्ट्र शासनाकडून संजय गांधी योजनेतील पेन्शनला विलंब होत असल्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

उत्तरप्रदेशमधील रायपूर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फलक लावल्याच्या कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गोळ्या घालून हत्या करून त्याच्या प्रेताचे विल्हेवाट लावणाऱ्या उत्तर प्रदेशमधील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. त्यांना अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी  तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये गेले दोन वर्षापासून सातत्याने दोन ते तीन महिन्यापासून विलंब होत (Pune) असल्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य महबूब भाई नदाफ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे पदाधिकारी सरचिटणीस कविराज संघेलिया, ज्ञानेश्वर कांबळे पुणे शहर काँग्रेसचे सचिव राहुल तायडे, पुणे शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सूडगे, पुणे शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष हंगर्गी संदीप कांबळे प्रभागाचे अध्यक्ष शाम गायकवाड ऍंथोनी वाकडे ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव, ज्ञानेश्वर जगताप राजू दांडगे यांचा सह शेकडोच्या सखेने नागरिक बंधू भगिनी व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Pune-Pimpri : पुणे-पिंपरी डिजीटल मिडियाच्या Editors Guild ची स्थापना, कार्यकारिणीची पहिली बैठक संपन्न

यावेळी उत्तर प्रदेश सरकार व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या. यावेळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेच्या तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी पुणे शहराध्यक्ष सुजित यादव यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशमधील विद्यार्थ्यांवर गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तीव्र कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्र शासन आणि मोदी सरकारच्यावतीने जो नागरिकांच्या कररुपी पैशातून सध्या ज्या जाहिरातीवर पैसा उडवला जातोय त्याचा अपव्यय टाळून गोरगरिबांच्या पेन्शन वेळेवर देण्यात यावी. पुन्हा विलंब झाल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यादव यांनी दिला. आभार ॲन्थोनी वाकडे यांनी मानले.

हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी अहमद पटेल, फारूक शेख, अभिषेक यादव, रणवीर कांबळे, निखिल चौरे, आशिष चाबुकस्वार, ऋतिक कोटेकर, विनय कदम, स्वरूप धिवार आदींनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.