Pune : राजगृहाची तोडफोड करणाऱ्या अज्ञात समाजकंटकाचा काँग्रेसतर्फे निषेध

Congress protests against unknown miscreant who vandalized Rajgruha

एमपीसी न्यूज – भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या राजगृहाची तोडफोड करणाऱ्या अज्ञात समाजकंटकाचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. 

इथल्या मनुवादी आणि जातीयवादी व्यवस्थेला डॉ. बाबासाहेब आंबेडरांनी तयार केलेले भारतीय संविधान नको आहे. म्हणून ते वेगवेगळ्या प्रकारे अशा घटना घडवून भारतीय संविधानाचा अपमान करीत आहेत.

सर्व संविधानवादी व धर्मनिरपेक्षवादी पक्ष, संघटना, नेते, कार्यकर्त्यांनी आपापसातले मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी संविधान टिकवण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केले आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालयीन सचिव उत्तरे भूमकर यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. दरम्यान, राजगृहाची तोडफोड करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी पुण्यातून होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.