Pimpri : बेरोजगारी, महागाई व महिला अत्याचार विरोधात शनिवारी काँग्रेसची ‘भारत बचाव रॅली’

एमपीसी न्यूज – बेरोजगारी, महागाई व महिला अत्याचार विरोधात काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि.14)  दिल्लीतील रामलीला मैदान ते संसदभवन मार्गावर ‘भारत बचाव रॅली’ काढण्यात येणार आहे. या रॅलीत पिंपरी-चिंचवड शहरातून काँग्रेसचे शंभर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिली.

दिल्लीतील रामलीला मैदान ते संसदभवन मार्गावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत बचाव रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. याच्या पूर्व तयारीची बैठक आज (सोमवारी) आकुर्डी येथे आयोजित करण्यात आली होती.

केंद्र सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारी व महागाई वाढली आहे. जीएसटी व नोटा बंदीच्या निर्णयामुळे औद्योगिक उत्पादन ठप्प झाले असून देशाचा जीडीपी घसरला आहे. मागील साडेपाच वर्षात केंद्र सरकारने शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला यांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शेतमालाला दीडपट हमी भाव दिला नसल्यामुळे कर्जबाजारी शेतक-यांच्या आत्महत्या वाढतच आहेत.

कामगारांच्या न्याय्य हक्कांवर अतिक्रमण करणारे ‘‘नीम’’ धोरण राबवून केंद्र सरकारने कामगारांचे आर्थिक, शारीरिक व सामाजिक शोषण केले आहे. एम्स आणि आयआयटीच्या दर्जाचे महाविद्यालय देशभर उभारू असे आश्वासन दिले होते. ते देखील पूर्ण केले नाही. तरुणी व महिलांवरील अन्याय, अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होतच आहे. देशाची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. याच्या निषेधार्थ ‘भारत बचाव रॅली’ काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीला माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, विष्णूपंत नेवाळे, संग्राम तावडे, शामला सोनवणे, बिंदू तिवारी,  गिरीजा कुदळे, मयूर जैसवाल, लक्ष्मण रूपनर, मकरध्वज यादव, शहाबुद्दीन शेख, दिलीप पांढारकर, मेहताब इनामदार, सुनील राऊत, ॲड. मोहन आडसूळ, विश्वनाथ खंडाळे, हरीदास नायर, माधव पूरी, विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, गौरव चौधरी, एन.पी. रवी, दीपक जाधव, किशोर कळसकर, हुरबानो शेख, परशुराम गुंजाळ, मीनाताई गायकवाड, हिरामण खवळे, चंद्रशेखर जाधव, बाबा बनसोडे, मुनसफ शेख, संदेश बोर्डे, मोहन अडसूळ, कुंदन कसबे, व्ही.एस.कबीर, विठ्ठल कळसे, अनिल बिरादार, वसीम शेख, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.