Pimpri : गॅस दरवाढ मागे घेण्यासाठी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

एमपीसी न्यूज – गॅस दरवाढ मागे घेण्याची मागणी पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसने केली आहे. याबाबत आकुर्डी येथील नायब तहसीलदार अंकुश आटोळे यांना हे निवेदन देण्यात आले.

युवकाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, हिराचंद जाधव, नासीर चौधरी, सौरभ शिंदे,   राहुल काळभोर, विरेंद्र गायकवाड, युनुस बागवान, कुदंन कसबे, दीपक भंडारी, रोहीत शेळके आदी उपस्थित होते. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, घरगुती वापराच्या गॅस दरवाढीमुळे सामान्य नागरिकांवर अतिरिक्त खर्चाचे ओझे वाढले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रंचड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी, वाढतच चाललेली महागाई अधिकच अन्यायकारक होत चालली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ ही नागरिकांना वेठीस धरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.