Pimpri News : कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; काँग्रेसचा इशारा

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयी चुकीचे वक्तव्य करणा-या कंगना राणावतचे आणि तिचे समर्थन करणा-या विक्रम गोखले यांचे चित्रपट पिंपरी-चिंचवड शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला.

पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राणावत व गोखले यांचा निषेध करीत त्यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेवर शाई फेकण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव गौतम आरकडे, शहराध्यक्ष कैलास कदम, पर्यावरण विभागाचे प्रदेश अध्यक्ष अशोक मोरे, युवकचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी महापौर कविचंद भाट, पांडुरंग गडेकर, विजय ओव्हाळ, ज्ञानेश्वर मलशेट्टी, हिराचंद जाधव, आबा खराडे, के. एम. रॉय, के. हरी नारायण, इस्माईल संगम, रोहित भाट, विश्वनाथ जगताप, नयन पांलाडे, रोहित तिकोणे, छायाताई देसले, पूजाताई बिबवे, कबीर मोहम्मद, हमीद इनामदार, बाबा बनसोडे, बाबा गायसमुद्रे, विशाल सरवदे आदी यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.