Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील एक जागा काँग्रेस लढवणार

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड शहरातील एक जागा लढवणार आहे. मात्र, ती जागा कोणती लढवली जाईल हे मात्र गुलदस्त्यात आहे. यावर पक्षश्रेष्ठींचा निर्णय होणार आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

राष्ट्रवादी, काँग्रेस येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 125 पेक्षा अधिक जागा लढवणार आहे. तर 138 जागा मित्र पक्षांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. राज्यात पाच ते सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचे बल चांगले असल्यामुळे त्याबाबतची चर्चा दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांशी होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात यापूर्वी काँग्रेस पक्षाने विधानसभेसाठी एक जागा लढवली होती. त्याप्रमाणे यावेळी देखील काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहरात एक जागा लढविण्यासाठी तयार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तीन विधानसभा मतदारसंघ येत असल्याने त्यातील कोणत्या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार उभा राहील. हे मात्र अजूनही गुलदस्त्यात असल्याचेही चव्हाण म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.