Pimpri : महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री काँग्रेसच देईल – प्रणिती शिंदे

एमपीसी न्यूज – शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही महिला मंत्री नाही. महिला व बालकल्याण खातेही महिलेकडे नाही. ही मोठी शोकांतिका असल्याची टीका करत राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री काँग्रेस पक्षच देईल असे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

पिंपरीत पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, महिला मंत्र्यांकडे नगरविकास, महसूल, उत्पादन शुल्क अशी खाती मिळाली पाहिजेत. या सरकारमध्ये तर एकही महिला मंत्री नाही. महिलेकडे महिला व बालकल्याण खातेही नाही. या देशाला पहिल्या महिल्या पंतप्रधान, महिला राष्ट्रपती, महिला लोकसभा अध्यक्षा काँग्रेसने दिल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री काँग्रेसच देईल.

Bhosari : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकवला

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसने महिलांना आरक्षण दिले. त्यामुळे आज अनेक महिला सरपंच, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष, महापौर म्हणून चांगले काम करत आहेत.(Pimpri) विधानसभा, लोकसभेलाही महिलांना आरक्षण दिले पाहिजे. पण, भाजप देत नाही असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसने दलितांवर कधीही अन्याय केला नाही. सुशीलकुमार शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद दिले. देशाचे गृहमंत्री, उर्जामंत्री केले. लोकसभेचा नेता केले. काँग्रेसने कधीही दलितांवर अन्याय केला नाही, असेही त्या म्हणाल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.