Lonavala : जमिया विद्यापीठ विद्यार्थ्यांना मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

एमपीसी न्यूज – जमिया विद्यापीठ विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा तसेच सी.ए.ए. व एन.आर.सी. विधेयकाच्या निषेधार्थ लोणावळा शहर काँग्रेस व मावळ तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आज लोणावळा शहरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

केंद्र सरकारने नुकत्याच पास केलेल्या भारतीय नागरिकता संशोधन विधेयक (सी.ए.ए.) आणि राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर (एन.आर.सी.) याला विरोध करणाऱ्या जमिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा तसेच नव्याने पास करण्यात आलेल्या सी.ए.ए. व एन.आर.सी. बिलाचा निषेध देशभरात ठिकठिकाणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे लोणावळा शहरात देखील या घटनेचा निषेध करण्यात आला.

त्यासाठी लोणावळा शहर काँग्रेस व मावळ तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने लोणावळा शहरातील मुख्य शिवाजी चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय गवळी, शहराध्यक्ष विलास बडेकर, नगरसेवक निखिल कविश्वर, सुधीर शिर्के, महिला शहराध्यक्ष पुष्पा भोकसे, नगरसेविका आरोही तळेगावकर, संध्या खंडेलवाल, सुर्वणा अकोलकर, माजी नगराध्यक्ष राजू गवळी, सेवादलाचे अध्यक्ष बाबुभाई शेख व सुनील मोगरे, माजी नगरसेवक नासिर शेख, फिरोज बागवान, मजहर खान, आब्बास खान, रफिक खलिफा, समीर खान, जाकिर शेख, सर्फराज शेख, नाजिम बागवान, शकिल बागवान यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.