Wakad crime : वाकड चौकातील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातास कॉन्ट्रॅक्टरला जबाबदार धरत गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : हिंजवडी पोलिसांनी सोमवारी वाकड चौकातील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातासाठी पुणे बंगळूर हायवेच्या देखभाल करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.(Wakad crime)अशी माहिती हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.

पुणे – बंगळुरू हायवे देखभाल करण्याची कॉन्ट्रॅक्ट असलेले कॉन्ट्रॅक्टर यांच्या विरोधात भा.द.वि. कलम 336 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती हिंजवडी पोलिस ठाण्यातील पोलीस नाईक आबा सुळ यांनी सोमवारी रात्री दिली आहे. मुगळीकर म्हणाले की,(Wakad crime) खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामुळे मनुष्यहानी होण्याची शक्यता होती तसेच स्ट्रक्शन झाले आहे. यामुळे हायवे देखभाल करणाऱ्या कॉन्टॅक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी एक व दोन महिन्यापूर्वी कॉन्ट्रॅक्टरला खड्डे बुजवण्यासाठी पत्र दिले होते. याबाबत त्याच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक सुद्धा झाली होती. पण अद्याप पर्यंत काही सुधारणा झाली नाही. त्यामुळे आम्ही कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुगळीकर पुढे म्हणाले की, हिंजवडी पोलिसांच्या हद्दीमध्ये यापुढे कोणत्याही रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास तो रस्ता देखभाल करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर च्या विरोधात हिंजवडी पोलीस गुन्हा दाखल करतील.

State wild life board meeting : राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत 18 नवीन संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत

फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, त्यांनी सोमवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास पुणे बंगळूर हायवे वरील वाकड ब्रिजच्या खाली वाकड चौकात अपघात झाला असल्याचे पाहिले.(Wakad crime) तिथे ट्रक पलटी होऊन पडला होता. ट्रक ड्रायव्हरने सांगितले की, हायवेने जात असताना खड्ड्यात आपटून त्याच्या ट्रकचा स्टेरिंग रॅाड तुटला. त्यामुळे त्याचा ट्रक वरील ताबा सुटल्याने ट्रक डिव्हाइडरला धडकून पलटी झाला. यामुळे ट्रकचे व हायवेचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताचे सविस्तर वृत्त एमपीसी न्यूजने सोमवारी दिलेले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.