Parenting Workshop In Pune : पुण्यात उद्या पालकांसाठी ‘सजग पालकत्व’ कार्यशाळा

एमपीसी न्यूज – कुमारावस्थेतील आणि पौगंडावस्थेतील मुलांना त्यांच्या भावनांची ओळख यात्री ह्या उद्देशाने साई एज्युकेशन पुणे वाटर तर्फे पुणे शहर आणि आजूबाजूच्या शाळातून भावनिक सजगते वर मोफत सत्र (Parenting Workshop In Pune) घेतली जातात.

असे कार्यक्रम घेताना मुले आणि पालक यांच्यातील संबंध अधिक चांगले करण्यासाठी काही प्रयत्न आवश्यक आहेत हे लक्षात घेत उद्या (रविवारी) भावे हायस्कूल पुणे येथे सजग पालकत्व कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे. सकाळी दहा ते एक या कालावधीत ही कार्यशाळा पार पडणार आहे.

Vehicle Thief Arrested: दुचाकी चोरणाऱ्या सराईताला आळंदी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

या कार्यशाळेचा उद्देश सजग पालकत्वाद्वारे मुलाच्या भावविश्वाची ओळख करून घेणे, पाय-पालकांमधला संवाद सजगतेने सुदृढ करणे, आणि यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘माईंडफुलनेस थेरपी’ ह्या संकल्पनेची तोंडओळख करून देणे हा आहे. तरी या कार्यशाळेच्या मार्फत पालकत्व अधिक सजग कसे होईल यावर संस्था भर देते.

Talegaon Dabhade: तळेगाव दाभाडे येथे दोन दिवसीय कॅरम स्पर्धेचे आयोजन

साईप एज्युकेशन इनिशिएटिव्ह ची सुरुवात Mindfulness अर्थात ‘सजगतेच्या प्रसारासाठी 2017 साली sipe mind हे अँड्रॉइड अँप सुरू करत झाली. ऑनलाईन माध्यमाद्वारे माईडफुलनेस शिकण्यासाठी आणि नियमित सरावासाठी मराठी हिंदी भाषेत अशा प्रकारचे हे एकमेव अँड्रॉइड अँप आहे. साईप एज्युकेशन तर्फे घेतल्या जाणाऱ्या Certificate in Mindfulness therapy आणि सर्टिफिकेट इन आयुर्वेद सत्त्ववाजय या कोर्सेस ना कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, विस्तार विभाग यांची मान्यता आहे.

ही कार्यशाळा सशुल्क असून नोंदणी शुल्क- 300 एका व्यक्तीसाठी, 500 दोन व्यक्तींसाठी असा नाममात्र दर आकारण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांना शिल्पा तांबे 9226958888 व 9607059213 / [email protected]

गुगल पे नंबर 9422054551 येथे संपर्क साधता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.