PMPML : ‘पीएमपीएमएल’ च्या मुख्य प्रशासकीय इमारतीत ‘संविधान दिन’ साजरा

एमपीसी न्यूज – भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, म्हणून पीएमपीएमएलच्या (PMPML) मुख्य प्रशासकीय इमारतीत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून आज 26 नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला.

पीएमपीएमएलचे अधिकारी तसेच अॅडमिन व सेंट्रल वर्कशॉप विभागातील कर्मचारी यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. याप्रसंगी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार-पवार यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व व संविधानाने सामान्य नागरिकांना दिलेले अधिकार याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) दत्तात्रय झेंडे, झोनल मॅनेजर राजेश कुदळे, डेप्युटी चिफ मॅनेजर (अॅडमिन) सुभाष गायकवाड, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, स्टोअर ऑफिसर चंद्रशेखर कदम, मार्केटयार्ड डेपो मॅनेजर नारायण भांगे (PMPML) आदी उपस्थित होते.

Talegaon Dabhade : स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुलमध्ये संविधान दिन साजरा

भारतीय संविधानाची निर्मिती करून आपल्याला मूलभूत हक्क व त्यांचे रक्षण करण्याचा अधिकार देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महान कार्य केले आहे असे प्रतिपादन पीएमपीएमएलचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) दत्तात्रय झेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी दत्तात्रय झेंडे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा समारोप केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.