Constitution Day celebration: चिखलीतील घरकुल येथे संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज – भारतीय नागरिकांना संविधानाचे महत्व कळावे जनजागृती व्हावी यासाठी संपूर्ण देशात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन साजरा केला जातो.याच उद्देशाने निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने शनिवारी (दि.26) चिखलीतील घरकुल मेन सर्कल येथे भारतीय संविधान दिन सोहळा 2022 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Pimpri news: शेतकऱ्यांच्या मागण्यावर आश्वासनाची पूर्ततेसाठी प्रश्नांसाठी राज्यपाल,पंतप्रधानांना निवेदन

यावेळी घरकुल फेडरेशन अध्यक्ष सुधाकर धुरी, सामजिक कार्यकर्ते अजय विजय जाधव आणि फेडरेशन चे पदाधिकारी उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी म्युझिक मेकर्स यांच्यातर्फे गाण माझ्या भिमाचं या भिम गितांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांची गायकांनी मने जिंकली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.