Maval News : विविध उपक्रमांनी संविधान दिवस साजरा

एमपीसी न्यूज – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोयरे येथे शुक्रवारी (दि. 26) विविध उपक्रम राबवून संविधान दिवस साजरा करण्यात आला. विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास पंचायत समिती मावळचे माजी सभापती व विद्यमान सदस्य गुलाबराव म्हाळसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच भोयरे गावचे विद्यमान सरपंच बळीराम भोईरकर, शालेय व्यवस्थान समिती अध्यक्ष रामदास भोईरकर, उपाध्यक्ष राजाराम करवंदे सदस्य बाळू आडिवळे, वसंत आडिवळे, ग्रामसेविका श्रीम. प्रमिला सुळके मॅडम, शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

23 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. निबंधलेखन, काव्यलेखन, हस्ताक्षर, चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व इत्यादी स्पर्धा घेऊन प्रत्येक स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकास मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

संविधानाविषयी विद्यार्थी भाषणे तसेच संध्या नवथळे यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. बळीराम भोईरकर यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा व मार्गदर्शन केले. गुलाबराव म्हाळसकर यांनी “माझे संविधान माझा अभिमान” या विषयावर विद्यार्थ्यांची संवाद साधला तसेच शाळा, शालेय परिसर व शाळेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे नियोजन शांता विरणक, मारुती खुरसुले, मोहन भोईरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तानाजी शिंदे व अर्चना गाढवे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक रामचंद्र विरणक सर यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.