Constitution Day of India: न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे “भारतीय संविधान दिन” उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे ”भारतीय संविधान दिन” साजरा करण्यात आला. संस्थेचे सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार सर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सामूहिक उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार,सामाजिक कार्यकर्ते युवराज प्रगणे,बाळासाहेब शेंडगे व शिक्षक वृन्द उपस्थित होते.यावेळी स्कूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक – विमल गार्डन – कोकणे चौक स्कूल अशी संविधान दिंडी काढण्यात आली. यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते व दिंडीतील विद्यार्थ्यांच्या घोषणांनी सर्वत्र परिसर दुमदुमून गेला.

Maval : पवना धरणग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करा – आमदार सुनील शेळके यांचा आंदोलनाचा इशारा

संदीप चाबुकस्वार सरांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले “संविधान कितीही चांगले असो,ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ,ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही तसेच आपले सामाजिक आणि आर्थिक उदिष्ट्येच्या पूर्ततेसाठी संविधानिकतेचा मार्गाचीच कास धरली पाहिजे” असे त्यांनी उद्गार काढले. देवयानी काटे, मधुरा होळ,अनोखी शेंडगे, स्वराज या विद्यार्थ्यांनी भाषण केले.

सातवीच्या विद्यार्थ्यांनी एकांकी सादर केली व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भारत का लाल हे गीत सादर केले .यावेळी २६/११ च्या मुंबई दहशतवाद्यांच्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या वीर पुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .कार्यक्रमांसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहशिक्षिका साळवी यांनी केले व अर्पिता तिवारी या विद्यार्थिनीने आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.