Kiwale News : नवव्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – नवव्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मायहोम किवळे, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे येथे 21 डिसेंबर 2021 रोजी हि घटना घडली. 

रमन अखिल विश्वास (वय 31) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे.

याप्रकरणी रावेत पोलीस चौकीचे पोलीस नाईक महादु विठ्ठल डामसे यांनी शुक्रवारी (दि.14) देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष दगडु माळवदे (वय 41, रा. पुणे) व धवल कांतीलाल संघवी (वय 51, रा. मार्केट यार्ड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमन विश्वास बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या साईटवर, नवव्या मजल्यावरती काम करत होते. त्यावेळी तिथून खाली पडल्याने जखमी झालेल्या रमन यांचा मृत्यू झाला आहे. बांधकाम साईट वर सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी न घेतल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. देहुरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.