Pune : बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा – लोकजनशक्ती पार्टीची मागणी

एमपीसी न्यूज –  बांधकाम कामगारांना सुरक्षा व त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, असे मत लोक जनशक्ती पार्टी पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांनी व्यक्त केले.

यावेळी दीपक भडके, राहल उभे, सुरेश सहानी, के.सी. पवार, रजिया(भाभी) खान, राहूल कुलकर्णी, प्रमोद राजगुरू, आप्पा भोसले, दामू चौधरी,सविता रणदिवे, उज्वला कांबळे, लता आवळे, वैशाली वाघमारे, कमल देडे,समिरा शेख, जया मोरे,जय भारत निवाद, राजू ठाकूर, राहुल शळके, परमजीत कुमार,श्रीनाथ अडागळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

इमारत बांधकाम कामगारामध्ये मराठी बरोबरच उत्तर भारतीय कामगारांचीही संख्या लक्षणीय आहे. या कामगारांच्या सुरक्षेबरोबरच त्यांना शासकीय योजनांमध्येही सामावून घेतले पाहिजे, असे मत लोक जनशक्ती पार्टीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या पुण्यातील आयोजित  बैठकीमध्ये मांडले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले जास्तीत जास्त नागरिकांना आणि बांधकाम कामगाराना  योजनांची माहिती मिळाली पाहिजे आणि ते मिळणे गरजेचे तर आहेच तसेच त्यांच्या हिताचेही आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.