Pune News : गरवारे मेट्रो स्थानक परिसरातून 50 हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरीस

एमपीसी न्यूज : कर्वे रस्त्यावरील गरवारे मेट्रो स्थानकाच्या (Pune News) आवरातून चोरट्यांनी बांधकाम साहित्य चोरुन नेले आहे.याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

गरवारे मेट्रो स्थानकाच्या आवारातून  लोखंडी कठडा, पत्रा, छोटे पाईप असे 50 हजार रुपयांचे साहित्य लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत मेट्रो स्थानकातील सुरक्षारक्षक संदीप कदम (वय 48, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

MPC News Podcast 16 March 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

 

गरवारे मेट्रो स्थानकाच्या परिसरात लोखंडी कठडा, पत्रा, पाईप असे साहित्य ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी 50 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला.(Pune News) गेल्या आठवड्यात गणेशखिंड रस्ता परिसरातून मेट्रोचे साहित्य चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली होती. सहायक फौजदार सय्यद तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.