Hinjawadi News : नो ब्रोकर डॉट कॉम लिंक मधील कॉन्टॅक्टने एकाची 1 लाख रुपयांची केली फसवणूक

एमपीसी न्यूज : नो ब्रोकर डॉट कॉम लिंक मधील कॉन्टॅक्टने (Hinjawadi News) एकाची 1 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना हिंजवडी येथे 6 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 6 वा ते रात्री 10 वा चे सुमारास घडली आहे.

याबाबत 23 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दोन मोबाईल वापरकर्ते ज्यांचे नाव कुणाल व मनीष असे सांगत होते. या आरोपीचे विरोधात भा.द.वि कलम 420, 34 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क), 66(ड) अन्वये पुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : पुण्यात एकावर एक फ्री चे आमिष भोवलं, 400 रुपयांची थाळी पडली 1 लाख रुपयांना

फिर्यादी त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांना मुंबई येथे फ्लॅट रेंट ने पाहिजे असल्याने गुगल वर सर्च करत असताना नो ब्रोकर डॉट कॉम ही लिंक ओपन करून त्यामध्ये असलेले कॉन्टॅक्ट वरती रूम संदर्भात विचारणा केली. तेव्हा वरील आरोपी यांनी संगमत करून रूमचे सेक्युरिटी डिपॉझिट रूम (Hinjawadi News) डिपॉझिट रूम रेंट असे सांगून व त्यानंतर ऑनलाईन सिस्टीम मध्ये एरर येत आहे असे सांगून फिर्यादी यांच्याकडून विविध वाहण्याने अनेक वेळा असे एकूण 1,00,407 रुपये स्वीकारून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.