Pune : पुणे ग्रामीण पोलिसांशी संपर्क करा सोशल मीडियावर

फेसबुक, ट्विटर, व्हाट्स अप अकाउंट उघडण्याचे अधीक्षकांचे आदेश

एमपीसी न्यूज – सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीणमधील सर्व पोलीस ठाण्यांना फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्स अप अकाउंट उघडण्याच्या सूचना दिल्या आहेत. व्हाट्स अप अकाउंट उघडण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रत्येक पोलीस ठाण्यांना मोबाईल नंबर देखील देण्यात आले आहेत. नागरिकांशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी साधन असल्याने हा प्रयोग सुरु केला आहे.

पुणे ग्रामीणमधील सर्व नागरिकांना आता पोलिसांशी आपल्या तक्रारी, सूचना तसेच अन्य कामांसाठीचा सोशल मीडियाद्वारे थेट संपर्क करणे उपयुक्त होणार आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या अभिनव कल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाणे तसेच उपविभागाला 9552 या सिरिजने सुरू होऊन 100 या क्रमांकाने शेवट होणारे मोबाईल क्रमांक जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे पुरविण्यात आले आहेत.

नागरिकांकडे असलेली माहिती दृकश्राव्य स्वरूपात पोलिसांना मिळावी. नागरिकांचा वेळ वाचावा तसेच पोलीस प्रशासनाशी संपर्क प्रभावीपणे वाढावा, यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आलेले नंबर चोवीस तास उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे नागरिक फोटो, विडिओ आणि टेक्स्टच्या माध्यमातून समस्या, तक्रारी पोलिसांना पाठवू शकतात. तसेच ट्विटर, फेसबुक आणि प्रत्यक्ष कॉलच्या माध्यमातून संपर्क करू शकतात. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.

पोलिस ठाणे व मोबाईल क्रमांक –
सायबर पोलिस ठाणे – 9552670100
एलसीबी – 9552680100
नियंत्रण कक्ष पुणे – 9552690100
बारामती (एसडीपीओ) – 9552230100
बारामती शहर – 9552287100
बारामती तालुका – 9552293100
इंदापूर – 9552298100
वालचंदनगर – 9552368100
भिगवण – 9552386100
वडगाव निंबाळकर – 9552397100
दौंड (एसडीपीओ) – 9552630100
दौंड – 9552612100
शिरुर – 9552634100
शिक्रापूर – 9552653100
यवत – 9552654100
रांजणगाव एमआयडीसी – 9552676100
भोर (एसडीपीओ) – 9552650100
जेजुरी – 9552678100
सासवड – 9552687100
राजगड – 9552689100
भोर – 9552593100
हवेली (एसडीपीओ) – 9552482100
हवेली – 9552753100
लोणी काळभोर – 9552778100
वेल्हा – 9552813100
लोणीकंद – 9552893100
खेड (एसडीपीओ) – 9552890100
खेड – 9552192100
घोडेगाव – 9552097100
मंचर – 9552094100
जुन्नर (एसडीपीओ) – 9552950100
जुन्नर – 9552164100
नारायणगाव – 9552137100
ओतूर – 9552157100
आळेफाटा – 9552186100
देहूरोड (एसडीपीओ) – 9552206100
पौड – 9552464100
लोणावळा (एसडीपीओ) – 9552780100
लोणावळा शहर – 9552026100
लोणावळा ग्रामीण – 9552063100
कामशेत – 9552069100
वडगाव मावळ – 9552018100

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.