Pimpri : पिंपरीत ग्रेड सेपरेटर मध्ये अडकला कंटेनर; वाहतूकीचा खोळंबा

एमपीसी न्यूज – पुणे – निगडी मार्गावर पिंपरी येथे ग्रेड सेपरेटर मध्ये एक कंटेनर अडकला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) रात्रीच्या वेळी घडली. दरम्यान कंटेनर अडकल्याने पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक खोळंबली.

पुणे – निगडी मार्गावर पिंपरी येथे शुक्रवारी रात्री एक कंटेनर ग्रेड सेपरेटर मध्ये अडकला. त्यामुळे जुना पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी ते निगडी या मार्गावरील वाहतूक खोळंबली. रात्रीच्या वेळी ही घटना घडली असल्याने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या.

दरम्यान, कंटेनरचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. शनिवारी सकाळी वाहतूक पोलिसांनी ग्रेड सेपरेटर मध्ये अडकलेला कंटेनर बाहेर काढला. तात्पुरता पर्याय म्हणून जुना पुणे – मुंबई महामार्गावरील वाहतूक सर्विस रोडवरून वळविण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.